Buldhana Crime Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime : पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचे कारण आले समोर; अनैतिक संबंधातून गावातील व्यक्तीकडूनच सुपारी

Buldhana News : देऊळगाव राजा तालुक्यात पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांची हत्या झाली होती. घटनेनंतर पोलिसांनी लागलीच तपासचक्र फिरवत केवळ पाच तासात या प्रकरणाचा छडा लावला

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या दे ऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द येथील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. गळा आवळून त्यांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आला होता. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. दरम्यान अनैतिक संबंधातून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात सदरची घटना रविवारी समोर आली होती. यात पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांची हत्या झाली होती. घटनेनंतर पोलिसांनी लागलीच तपासचक्र फिरवत केवळ पाच तासात या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणातील मृत पोलीस कर्मचाऱ्याची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची कबुली मुख्य आरोपीने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

गावातील इसमानेच दिली सुपारी 

दरम्यान गावातीलच बाबासाहेब मस्के यांनी जालना जिल्ह्यातील टायगर नामक इसमाला सुपारी दिली होती. त्यावरून टायगर याच्या दोन साधीदारांनी मिळून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मस्के यांना एका बारमध्ये दारू पाजली. त्यानंतर बाहेर आणून त्याचा गळा आवळून हत्या केली. यानंतर पोलिसाचा मृतदेह गाडीमध्येच टाकून दिल्याचे समोर आले आहे. 

मुख्य आरोपीसह चार जण ताब्यात 

दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी तपास चक्र जोरात फिरवत खुनाच्या घटनेतील मुख्य आरोपी बाबासाहेब मस्के यांच्यासह खुनात सहभागी असलेल्या चार जणांना अटक केली आहे. दरम्यान यामध्ये अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Local Body Election : राज्यात मोठी राजकीय उलथापालथ? २८८ पालिका-पंचायतींसाठी स्थानिक नेतेच ठरवणार उमेदवार

Ladki Bahin Yojana KYC: उरला फक्त आठवडा! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

Success Story: जिद्द! एकदा नव्हे तर ६ वेळा MPSC क्रॅक; नांदेडचा लेक झाला क्लास १ ऑफिसर; ओमकेश जाधव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT