Buldhana News Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: अतिवृष्टीने झालेले नुकसान बघवेना... आईच्या निधनानंतर घेतला आदर्श निर्णय; बुलढाण्यातील कुटूंबाचे सर्वत्र कौतुक

Buldhana Rain: बुलढाणा (Buldhana) जिल्हातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात 22 जुलैला अतिवृष्टी (Heavy Rain) झाली होती.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana News: दिवंगत आईच्या तेराव्याचा इतर खर्च टाळून तो निधी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी देण्याचा स्तुत्य निर्णय बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एका कुटूंबाने घेतला. या निर्णयाचे सध्या कौतुक होत असून समाजासमोर एक आदर्श निर्माण केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा (Buldhana) जिल्हातील संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात 22 जुलैला अतिवृष्टी (Heavy Rain) झाली होती. यामध्ये हजारो नागरिकांची घरे वाहून गेली. पुरामध्ये अनेक कुटूंबाचा संसार उध्वस्त झाला होता. शासनाची तोडकी मदत काहींना मिळाली मात्र अद्याप ही काहींना कुठलीच मदत मिळाली नाही.

याच दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील विठ्ठल महाले यांच्या मातोश्री यांचे निधन झाले. त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम काल (१६, ऑगस्ट) होता. तालुक्यातील विदारक चित्र पाहून विठ्ठल महाले यांनी तेरावीला जो काही खर्च करणार होते तो संपूर्ण खर्च नुकसानग्रस्तांना देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.

त्यानुसार विठ्ठल महाले यांनी अनाथ मुले व गरजूंना स्वतः च्या पगारातून भरीव आर्थिक मदत केली आहे. मिराबाई साहू यांना 3001 रुपये हजार रुपये, मंदा दामोदर 2001 रुपये, वंदना ससाने 1500 रुपये तसेच शालेय शिक्षणासाठी 5001 रुपये, अशी आर्थिक मदत करून विठ्ठल महाले यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानी मंदिराला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा कवच

काळीज पिळवटून टाकणारी बातमी! कीर्तन करणाऱ्या भाविकांना कारने चिरडले, ५ जणांचा जागीच मृत्यू; परिसरात शोककळा

Nashik Fort : ३,५०० फूट उंचीवरचा सह्याद्रीतील लपलेला खजिना, नाशिकला गेल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

High cholesterol: हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं? डॉक्टरांनी सांगितले 3 साधे आणि सोपे उपाय

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! 'त्या' अपात्र महिलांची पुन्हा पडताळणी होणार

SCROLL FOR NEXT