
- बालाजी सुरवसे
Dharashiv News : धाराशिव येथील पालिकेच्या विविध योजनेत 27 कोटी 38 लाख 78 हजार 100 रुपयांचा अपहर केल्याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धाराशिव पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यासह अन्य दाेघांचा समावेश आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Breaking Marathi News)
धाराशिव नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे, तत्कालीन लेखापाल सुरज बोर्डे, तत्कालीन अंतर्गत लेखापरीक्षक प्रशांत पवार यांनी 6 जुलै ते 21 नोव्हेंबर दरम्यान नगरपरिषद धाराशिव येथे एकूण 1088 प्रमाणे शासकीय अभिलेख आहे हे माहित असताना व ते लेखा विभागात जतन करून ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाही.
याबराेबरच विविध विकास योजना व इतर अनुषंगिक खर्चाबाबतचे एकूण 514 प्रमाणे एकूण 27 कोटी 38 लाख 78 हजार 100 रुपयांचा अपहार केला.
तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणाचे जाणीवपूर्वक लेखा विभागात ठेवले नाहीत याप्रकरणी पालिकेचे लेखापाल अशोक कलेश्वर फरताडे यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.