Onion Procurement: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नाफेड पुन्हा करणार कांद्याची खरेदी; केंद्रीय मंत्री भारती पवार यांची माहिती

Maharashtra Farmer News: नाफेडच्या माध्यमातून पुन्हा कांदा खरेदी होणार असल्याची माहिती केंद्रिय मंत्री भारती पवार यांनी दिली आहे.
Onion farmers
Onion farmers Saam tv
Published On

Nashik News: टोमॅटोच्या माध्यमातून कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हस्तक्षेत्र करण्यास सुरुवात केली. दरम्यान, कांदा बाजारात आणून शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगली असतानाच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नाफेडच्या माध्यमातून पुन्हा कांदा खरेदी होणार असल्याची माहिती केंद्रिय मंत्री भारती पवार यांनी दिली आहे.

Onion farmers
Pune Crime News: पुण्यात चाललंय तरी काय? पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेनं दहशत

याबाबत अधिक माहिती अशी की, नाफेडच्या माध्यमातून पुन्हा कांदा खरेदी करण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्याचे दर घसरल्यानंतर मागील काळात नाफेड आणि एनसीसीएफकडून ३ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती.

त्यानंतर आता पुन्हा नाफेडच्या माध्यमातून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Onion farmers
Rain Forecast in Maharashtra : विश्रांतीनंतर पावसाचं पुन्हा कमबॅक होणार? राज्यात पावसाला पोषक वातावरण, हवामान विभागाचा अंदाज काय?

"याआधी नाफेड तसेत राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ (एनसीसीएफ)च्या माध्यमातून ३ लाख टन कांदा खरेदी करून बफर साठा केला होता. मात्र अजूनही कांद्याची मागणी होत असल्याने आणखी खरेदी करण्याची विनंती केंद्राकडे केली होती. त्यानुसार केंद्राने ही मागणी मान्य केली असून पुन्हा २ लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याची परवानगी दिली असल्याचे भारती पवार यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com