Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Jal Jeevan Yojana : जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा; मेहकर, लोणार तालुक्याच्या १५० गावात पाणीटंचाई

Buldhana News : गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन योजना राबविली जाते. त्यानुसार मेहकर व लोणार तालुक्यांमधील १५० गावांसाठी सदरच्या योजनेचे काम सुरु करण्यात आले

संजय जाधव

बुलढाणा : मेहकर व लोणार या दोन तालुक्यात सुमारे दिडशे गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत कामे सुरु आहेत. या जलजीवन योजनेच्या कामात प्रचंड अनियमितता दिसून आली आहे. त्यामुळे मेहेकर व लोणार तालुक्यात आतापासूनच भीषण पाणी टंचाई जाणवू  लागली आहे. या दोन्ही तालुक्यात जलजीवनची कामे न झाल्याने अथवा झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश व संताप व्यक्त होत आहे. 

गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन मिशन योजना राबविली जाते. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यांमधील जवळपास १५० गावांसाठी सदरच्या योजनेचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहेकर, लोणार तालुक्यातील १५० गावातील जळजीवन मिषांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. बुलडाणा जिल्ह्यामध्ये इतर तालुक्याच्या तुलनेत मेहकर व लोणार तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा उडाला असल्याचे स्पष्ट दिसून आले. 

योजनेच्या कामात अनियमितता 

कुठे मूळ पाण्याचा स्त्रोत नसताना अथवा सदरहून स्त्रोत शाश्वत नसताना पाईप लाईनची कामे करणे, पूर्ण काम न होता त्याची अर्धवट झालेल्या कामाची बिले उचलून कामे अर्धवट सोडणे. पाण्याची टाकी नसणे, विद्युत जोडणी नसणे, गाव अंतर्गत सुस्थितीतील रस्ते खोदून तेथे पाईपलाईनची कामे केल्यामुळे रस्ते अस्ताव्यस्त होणे. रस्ता उखडणे, पाईपलाईनचे काम सुमारे दोन वर्षापासून केले असल्याने सदर पाईपांचे नुकसान होणे, लावलेल्या नळांच्या तोटयांची चोरी होणे ही व अशा प्रकारच्या अनेक अनियमितता झाल्याचे दिसून आले आहे. 

त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी 

काही अपवाद वगळता जलजीवनच्या सर्व कामात शासनाच्या निधीचा अपव्यय झाले असल्याचे दिसून आले आहे. तरी दोन्ही तालुक्यात चालू व अर्धवट अवस्थेत असलेल्या जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात यावी. तसेच याबाबतचा चौकशी अहवाल मला अवगत करण्यात यावा; अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT