Buldhana Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Heavy Rain : बुलढाण्याच्या तीन तालुक्यात अतिवृष्टी; एक लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान

बुलढाण्याच्या तीन तालुक्यात अतिवृष्टी; एक लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) एक लाख हेक्टरवरील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. परिसरात आज पावसाने (Buldhana) विश्रांती घेतली असली तरी अद्यापही अतिवृष्टीची दहशत या भागातील नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आहे. (Maharashtra News)

संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक हेक्टरवरील पिके सध्या ही पाण्याखाली आहेत. तर संग्रामपूर शहरातील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. थोडक्यात म्हणजे संग्रामपूर जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात हे नुकसानीचे दृश्य दिसत आहे. गावात असो किंवा शेतात सगळीकडे काही ना काही प्रमाणात प्रत्येक नागरिकांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे. अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त संग्रामपूर तालुक्याला बसला असून या तालुक्यात जवळपास ४० हजार हेक्‍टरवरील पिकाचं नुकसान झाले आहे. प्रशासनाने या तिन्ही (Sangrampur) तालुक्यात पंचनामे सुरू केले असून खासदार प्रतापराव जाधव यांनी या परिसराचा आज दौरा केला व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत केल्या जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. 

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाला आहे तर हजारो घरांची पडझड झालेली आहे मात्र राज्य शासनाचा एकही प्रतिनिधी या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टी (Farmer) झाल्यानंतर 24 तासातही पोहोचला नव्हता त्यामुळे नागरिकात रोष आहे.. संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात शनिवारी अचानक ढगफुटी सदृश पाऊस बरसला. बावणबीर गावातील केदार नदीला महापूर आला होता. यामुळे मात्र अनेक शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं. परिसरातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिके एक तर पाण्याखाली आहेत किंवा जमीन खरडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट उभे राहिलेला आहे.

जळगाव तालुक्यातील जामोद गावचे गजानन ढेनगाळे यांचे चार एकर शेतीतील कापसाचे पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे. अतिवृष्टीमुळे यांच्या शेताची अक्षरश: नदी झालेली आहे आणि ही नदी खरवडून गेलेली आहे. त्यामुळे चार एकर कापसाचे पीक पूर्णपणे निस्तनाबूत झालेला आहे. या शेतकऱ्याचे जवळपास चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान सध्या झाले असून शेतीतील माती ही खरवडून गेल्यामुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात कायमचं नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT