Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : GNM परीक्षेचा पेपर फुटला; परीक्षेच्या आदल्या रात्रीच व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातील परिचारिका वस्तीगृहामध्ये एक केंद्र आणि दुसरे केंद्र हे पैनगंगा नर्सिंग कॉलेज या ठिकाणी देण्यात आले होते

संजय जाधव

बुलढाणा : जीएनएम अर्थात डिप्लोमा इन जनरल नर्सिंग अँड मिडवाईफरी याचा पेपर आज होणार होता. मात्र या पेपरच्या आदल्या रात्रीच पेपर फुटला आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका येऊन पडल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे.  

राज्यात आज GNM द्वितीय वर्षाची परीक्षा सुरू आहे. मानसिक आरोग्य परिचर्या विषयाचा आज तिसरा पेपर होता. दरम्यान (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयातील परिचारिका वस्तीगृहामध्ये एक केंद्र आणि दुसरे केंद्र हे पैनगंगा नर्सिंग कॉलेज या ठिकाणी देण्यात आले होते. याठिकाणी आज ११ ते २ या वेळेत पेपर नियोजित होता. मात्र शासकीय परिचारिका वस्तीगृहात काही विद्यार्थी कॉपी करत असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. यामुळे शिक्षकांनी त्या परीक्षार्थींची तपासणी करण्यास सुरवात केली. 

मोबाईल केले जप्त 

तपासणी केली असता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आज होणाऱ्या पेपरची कॉपी रात्रीच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी केंद्र प्रभारींनी सदर बाब वरिष्ठांना कळविली आहे. आठ ते दहा विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, पुढील कारवाई सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

SCROLL FOR NEXT