Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

Buldhana News : अतिवृष्टीत शेती पूर्णपणे खरडून गेल्याने शेतातील पीक नष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना हातात शून्य उत्पादन येणार असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न आहे

संजय जाधव

बुलढाणा : संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे होत्याच नव्हतं झाल असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून गेला आहे. मात्र प्रशासनातील कोणताही अधिकारी, कर्मचारी शेतीच्या बांधावर फिरकला नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर संपूर्ण शेती खरडून गेली असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. गुलभेली गावातील संजय बळीराम दळवी या शेतकऱ्याच्या शेतातील उभी सोयाबीन वाहून गेली आहेत. त्याचं बरोबर शेत जमीन खरडून गेली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला असून उदर निर्वाहचे साधनच राहिले नाही; यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतात केलेल्या खर्चाचा एक रुपयाचा मोबदला देखील मिळणार नाही. 

मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा 

दरम्यान दोन मुले आहेत. एकाला इंजिनियरिंग करायला मोठ्या शहरात पाठविले आहे. तर दुसरा शाळा शिकतोय. मुलांचं शिक्षण कसं करायचं. बँकेचे कर्ज घेऊन शेती पेरली. नाल्याच्या काठी असल्याने शेतात पाणी शिरले व उभी सोयाबीन खरडून गेली. ५० हजार रुपये खर्च केले हातात एक रुपया राहिला नाही; अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. 

तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही 
सरकारने कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिल होत. मात्र कर्जमुक्ती केली नसून दिलेले आश्वासन देखील पूर्ण केले नाही. आता तर जे शेतात पिकवले होते; ते पण निसर्गाने हिरावून घेतलं. कुटुंब उघड्यावर पडलं आहे. सरकाने तातडीने आर्थिक मदत केली नाही; तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली. हे सर्व सांगताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तराळले होते. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT