Buldhana News:  Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारा देवदूत! १५ किमीची पायपीट करत स्वखर्चाने करतोय उपचार

Buldhana News: आठवडाभरापासून असलेल्या अतिसाराच्या साथीची साधी दखलही आरोग्य प्रशासनाने घेतली नसल्याने जळगाव जामोद येथील एका देवदूताने 15 किलोमीटर पायी जाऊन स्वखर्चाने औषधाचा साठा नेत शेकडो रुग्णांचे जीव वाचवले आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव| बुलढाणा, ता. ९ सप्टेंबर २०२४

Buldhana Dr. Sandip Wakekar: बुलढाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोमाल गावात गेल्या आठवडाभरापासून अतिसराच्या साथीने थैमान घातले आहे. गोमाल या गावाला स्वातंत्र्यानंतरच्या काळातही रस्ता न मिळाल्याने अतिसाराने तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला , त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने हे मृत्यू झालेत.

मात्र आठवडाभरापासून असलेल्या अतिसाराच्या साथीची साधी दखलही आरोग्य प्रशासनाने घेतली नसल्याने जळगाव जामोद येथील एका देवदूताने 15 किलोमीटर पायी जाऊन स्वखर्चाने औषधाचा साठा नेत शेकडो रुग्णांचे जीव वाचवले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोमाल या आदिवासी गावात गेल्या आठवडाभरापासून अतिसाराची लागण झाली आहे. गावातील तीन रुग्णांना अतिसाराची लागण झाल्यानंतर रस्ता नसल्याने वेळेत उपचार मिळू शकला नाही आणि त्यामुळे तीन रुग्णांना जीव गमवावा लागला. तर अद्यापही गोमाल या गावात अनेक लहान मुलांना अतिसाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे सध्या ६८ रुग्ण अतिसराने गंभीर असून अनेकांना गावात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची आरोग्य प्रशासनाने दखल घेतली नसली तरी जळगाव जामोद येथील एका डॉक्टरांनी या रुग्णांची दखल घेत उपचार सुरु केले आहेत.

हा देवदूत आहे डॉ. संदीप वाकेकर. डॉ. संदीप वाकेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जामोद येथे बालरोग तज्ञ म्हणून आपला खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात. मात्र गोमाल गावात अतिसाराने अनेक रुग्ण बाधित झाल्याचे माहिती पडताच त्यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेत १५ किलोमीटर डोक्यावर औषधीचा साठा घेत खडतर प्रवास करत गोमाल गाव गाठले.

डॉ. संदीप वाकेकर यांनी गेले तीन दिवस गोमाल गावात रात्रंदिवस शेकडो रुग्णांवर उपचार करत या रुग्णांचा जीव वाचवला आहे. खरंतर जे काम प्रशासनाने करायला हवं ते काम अतिशय दुर्गम अशा पाड्यावर जाऊन या देवदूत डॉक्टरांनी स्व खर्चाने केले आहे. डॉ. संदीप वाकेकर यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT