Buldhana Chikhali Taluka News Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: चिखली तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापाची साथ; भानखेडमध्ये गर्भवती महिलेसह 2 मुलांचा मृत्यू

Chikhali Taluka News: तापामुळे आतापर्यंत दोन मुलांसह एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने भानखेड गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Chikhali Taluka News: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापाची साथ पसरली आहे. भानखेड आणि सवना गावात अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत. तापामुळे आतापर्यंत दोन मुलांसह एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने भानखेड गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Latest Marathi News)

डेंग्यू सदृश्य तापामुळे आतापर्यंत तीन जणांचा जीव गेल्याने आरोग्य प्रशासन कधी जागे होणार? गावकऱ्यांना या आजारापासून कधी मुक्तता मिळणार?, असा प्रश्न भानखेड (Buldhana News) आणि सवणा ग्रामस्थ करत आहेत.

चिखली शहराला (Chikhali News) लागूनच असलेल्या भानखेड येथे गेल्या तीन आठवड्यापासून डेंग्यू सदृश्य तापाची लागण लहान मुले तसेच वयस्कर व्यक्तींना झाली आहे. आतापर्यंत रुग्णाचा आकडा ५० पर्यंत गेल्याची माहिती आहे. यातील काही रुग्ण बरे झाले आहेत.

अद्यापही २५ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, उपचार सुरू असताना गुरूवारी (१५ जून) कांचन तारु या २३ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्यातही दोन लहान मुलांचा अशाच तापाने मृत्यू झाला होता.

आता गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरात जमिनीखाली पुरले नोटांचे निळे ड्रम्स, प्रयागराजमधील कॅशचं पुणे कनेक्शन?

Maharashtra News Live Update: १३.९६ कोटींच्या RTGS घोटाळ्यातील आरोपीला अटक

Fact Check: केंद्र सरकारकडून 8 हजारांचं दिवाळी गिफ्ट? अर्ज भरलेल्यांनाच मिळणार योजनेचा लाभ?

बाथरूम- टॉयलेटमध्ये तुम्हीही या 7 चुका करताय, वेळीच व्हा सावध नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

सुनेत्रा पवारांना वगळून NCP नेते शाहांच्या भेटीला; वळसे पाटील, मुंडेंचं मंत्रिमंडळात 'कमबॅक' होणार?

SCROLL FOR NEXT