Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : शाळेत येत मुख्याध्यापकाने संपविले जीवन; जानेफळ येथील घटना

Buldhana News : गवारे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची माहिती तात्काळ जानेफळ पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला

संजय जाधव

बुलढाणा : रोजच्या वेळेवर शाळेत आलेल्या मुख्याध्यापकाने शाळेच्या एका खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरची घटना (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथील शाळेत घडली आहे. (Breaking Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर (Mehkar) तालुक्यातील जानेफळ येथील श्री शिवाजी हायस्कूल या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले रत्नाकर शिवाजी गवारे (वय ५५) यांनी आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास (School) शाळेतील समोर आली. शाळेतील शिपायाला मुख्याध्यापक गवारे हे गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आले. गवारे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर याची माहिती तात्काळ जानेफळ पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

मुख्याध्यापक रत्नाकर गवारे यांनी शाळेतच आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान गवारे यांनी आत्महत्या का केली; याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT