Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : दुसऱ्या महिलेचे आधार कार्ड खात्याला केले लिंक; घेतला एक लाख रुपयाचा लाभ

Buldhana News : शासनाच्या विविध योजना सुरु असून बांधकाम कामगारांसाठी देखील वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत

संजय जाधव

बुलढाणा : बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजना राबवून मदत दिली जात आहे. दरम्यान बांधकाम कामगार कार्यालयाकडून इमारत बांधकाम कामगारासह त्याच्या पाल्यांना शिक्षण, आरोग्य यासह इतर बाबींसाठी आर्थिक लाभ दिला जातो. मात्र विधवा महिलेचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून एक लाख रुपयांचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे. 

शासनाच्या विविध योजना सुरु असून बांधकाम कामगारांसाठी देखील वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. मात्र बांधकाम कामगार असल्याचे दाखवत शासनाच्या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. (Buldhana) बुलढाणा तालुक्यातील आकाश हिवाळे या व्यक्तीने हा प्रकार केला आहे. आकाश हिवाळे याने मंगला गायके या विधवा महिलेचे आधार कार्ड आपल्या स्वतःच्या बँक (Bank) खात्याला लिंक करून एक लाख रुपयाचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

कारवाईची मागणी 

सदर महिला लाभ घेण्यासाठी आपले खाते नूतनीकरण करण्यासाठी बँकेत गेली असताना हा प्रकार समोर आला आहे. तर या संपूर्ण प्रकाराच्या बाबतीत बांधकाम कामगार कार्यालय मात्र अनभिज्ञ असून कार्यालयाचा अनागोंदी आणि गलथान कारभार यातून समोर आला आहे. दरम्यान फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT