20 lakh seized from bike yandex
महाराष्ट्र

Buldhana News: पोलिसांची मोठी कारवाई, बुलडाण्यात बाईकमधून २० लाख जप्त

20 Lakh Seized From Bike In Buldhana : बुलडाण्यात एका वाहनावर कारवाई करत पोलिसांनी तब्बल २० लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांकडून सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणावरून कोट्यवधीची रक्कम, सोनं जप्त करण्यात आले आहे. अशामध्ये आता बुलडाण्यात देखील एका वाहनावर कारवाई करत पोलिसांनी तब्बल २० लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांकडून सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहे. पोलिस प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. याचसंदर्भात बुलडाणा शहर पोलिसांनी बुलडाणा शहरातील कारंजा चौक येथे वाहन तपासाणी करत होते. यावेळी एका दुचाकीमध्ये २० लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली. तातडीने पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. संबधित व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. तसेच पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..

याआधी अहमदनगरमध्ये तब्बल २३ कोटींचे सोनं पोलिसांनी जप्त केल्याची घटना समोर आली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ठिकठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. अशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी सुपा टोलनाक्यावर पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने तब्ब्ल २३ कोटी ७१ लाख रुपयाचे सोन्याचे बिस्कीट तसेच चांदी जप्त केली होती. जप्त करण्यात आलेली कार ही पुण्यावरून संभाजीनगरकडे जात असताना पोलिसांनी सुपा टोलनाक्याजवळ ही कारवाई केली होती. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT