Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Ashram School : आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थीना विषबाधा; पाच विद्यार्थीनी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु

Buldhana News : रात्री मुलांना जेवणात कढी आणि भात देण्यात आला होता. मात्र कढी आणि भात खाल्ल्याने काही जणांना त्रास जाणवू लागला होता यानंतर मुलींना अचानक उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला होता

संजय जाधव

बुलढाणा : आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या १३ विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैंनगंगा शाळेत घडली आहे. यातील पाच विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असून सर्व विद्यार्थ्यांवर बुलढण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळा आहे.  पैनगंगा आदिवासी आश्रम शाळा ही बुलढाण्याचे माजी आमदार व सध्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची आहे. निवासी आश्रम शाळा असल्याने येथे विद्यार्थ्यांना दोन्ही वेळचे जेवण दिले जात असते. दरम्यान काल रात्री मुलांना जेवणात कढी आणि भात देण्यात आला होता. मात्र कढी आणि भात खाल्ल्याने काही जणांना त्रास जाणवू लागला होता. 

पाच विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर 

शाळेतील १३ विद्यार्थिनींना विषबाधा झाली. या मुलींना अचानक उलट्या व जुलाबाचा त्रास जाणवू लागला होता. याबाबत शिक्षक शाळा अधीक्षकांना सांगण्यात आले. मुलींना अधिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून यातील पाच विद्यार्थिनींनीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. 
 

चामोर्शी गावात आजाराची साथ  

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायत सगनापूर (भें) येथे १० जुलैला अचानक १०-१५ लोक आजारी झाले आहेत. यामध्ये ७-८ लोकांची अवस्था अत्यंत बिकट असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे भरती करण्यात आले आहे. तर इतर रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात अनेकांना उलट्या, हगवण, छातीत जळजळ, डोके दुखणे अशी लक्षणे दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

जत्रेला जाणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला; भरधाव वाहन ७०० मीटर खोल दरीत कोसळलं, २० जणांचा मृत्यू

Cricket controversy: धक्कादायक! आंघोळ करताना महिलांचे व्हिडीओ काढले, दोन खेळाडूंना अटक; क्रिकेट विश्व हादरले

Farmer ID Update : ...तर शेतकऱ्यांना कोणत्याच सुविधा मिळणार नाही; राज्य सरकारने 'फार्मर आयडी'बाबत घेतला मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! इतक्या महिला ठरल्या पात्र, पण यांचा ₹१५०० चा लाभ कायमचा बंद

SCROLL FOR NEXT