Buldhana Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Cyber Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली १० लाखात फसवणूक; सायबर पोलिसांनी संशयिताला गुजरातमधून केली अटक

संजय जाधव

बुलढाणा : ऑनलाईन फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला होता. या प्रकारात एका व्यक्तीची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तब्बल १० लाख रुपयात फसवणूक झाली होती. याबाबत सायबर पोलिसात दाखल तक्रारीनंतर पोलिसांनी संशयिताला गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. 

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या सुंदरखेड येथील एका व्यक्तीने बुलढाणा सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्याची शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाईन दहा लाख २० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी (Cyber Police) अधिक तपास करत आरोपी हा गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुलढाणा सायबर पोलिसांनी आरोपीला गुजरात मधून अटक केली आहे. 

आणखी काही गुन्ह्याची उकल 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अनिलजी अर्जुनजी ठाकूर असे संशयित आरोपीचे नाव आहे. ताब्यात घेतल्यानंतर अनिल ठाकूर याला न्यायालयात (Cyber crime) हजर करण्यात आले आहे. याच्याकडून अजूनही काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपस सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT