Buldhana Market Committee Election Results, mla sanjay gaikwad saam tv
महाराष्ट्र

Buldhana Market Committee Election Results : बुलढाणा बाजार समिती निवडणूकीत शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाडांना ठाकरे गटाकडून धोबीपछाड

या निकालामुळे बहुतांश ठिकाणी नवीन नेतृत्व उदयास आले आहेत.

संजय जाधव

Buldhana APMC Election Results : बुलढाणा जिल्हा पहिल्या टप्प्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समितीचा अंतिम निकाल हाती आला आहे. यामध्ये पाच पैकी तीन बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. हा निकाल आमदार संजय गायकवाड गटास माेठा धक्का मानला जात आहे.  (Breaking Marathi News)

जिल्ह्यात खामगाव व बुलढाणा बाजार समितीत आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. खामगाव येथे विद्यमान भाजपा आमदार आकाश फुंडकर यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपाला याठिकाणी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.

बुलढाणा बाजार समितीत विद्यमान शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना नवख्या असलेल्या ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत यांनी धोबीपछाड दिली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी याठिकाणी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Buldhana Krushi Utpanna Bazar Samiti Results : असा लागला निकाल

मलकापूर - भाजपा प्रणित पेनेल - भाजपा १६ , अपक्ष १ , महाविकास् आघाडी १. (सरशी माजी आमदार चैनसुख संचेती)

मेहकर - शिवसेना - ११ , महविकास् आघाडी - ७ . (सरशी खासदार प्रतापराव जाधव)

बुलढाणा - ठाकरे गट - १२ , भाजपा शिवसेना - ६ (सरशी जालिंदर बुधवत, ठाकरे गट )

देऊळगाव राजा - महाविकास आघाडी - १५ , शिवसेना - १ , अपक्ष - २ (सरशी राष्ट्रवादी आमदार राजेंद्र शिंगणे)

खामगाव - महविकास आघाडी - १६ , भाजपा - ०२ (सरशी माजी काँग्रेस आमदार दिलीप सानंदा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT