Water Supply
Water Supply Saam tv
महाराष्ट्र

Lonar Water Shortage : लोणार शहराला महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा; तेही मिळतेय दूषित स्वरूपात

संजय जाधव

बुलढाणा : जगप्रसिध्द लोणार शहर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच लोणार शहराची सर्वतोपरी दुरावस्था झालेली पाहण्यास मिळत आहे. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु झाला आहे. मात्र लोणार शहरातील पाणी टंचाईची समस्या सुटलेली नाही. आजही शहरात एक महिन्यातून एकदा पाणी पुरवठा होत असून तो देखील दूषित स्वरूपात होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसत आहे.

खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध असलेल्या (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. शहरात महिन्यातून केवळ एकवेळेस पाणी पुरवठा (Water Supply) केला जात आहे. ते ही पाणी दूषित व पिवळं रंगाच पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे लोणार वासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे, ते पाणी प्रयोग शाळेत तपासण्यात आले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल सुद्धा आला. तरीही लोणार नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. 

आंदोलनाचा दिला इशारा 

पाण्याच्या समस्येबाबत (Shiv Sena) उबाठाचे जिल्हाप्रमुख गोपाळ बच्चीरे यांनी जिल्हाधिकार्याना निवेदन देत ईशारा दिला आहे. येत्या दहा दिवसात पाणी स्वच्छ व महिन्यातून तीन वेळा पाणी पुरवठा करण्यात यावा. अन्यथा लोणार नगरपालिकेला कुलूप लावण्यात येईल; असा ईशाराच शिवसेना उबाठाच्या वतीने दिला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : नागपुरातील पाटणसावगीत धुमाकूळ घालणाऱ्या वानराला केलं रेस्कू

Worli Hit And Run: वरळीत 'हिट अँड रनचा थरार, भरधाव कारच्या धडकेत पती-पत्नी हवेत उडाले, भीषण अपघाताचा VIDEO समोर

CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीत गाफिल राहिलो, मुख्यमंत्री शिंदे यांची कबुली

Mumbai Local Train : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसारा-आसनगाव लोकलसेवा ठप्प

Late Night Sleeping Side Effects : रात्री एक पर्यंत जागे राहाल तर आरोग्यावर गंभीर परिणाम, वाचा उशिरा झोपण्याचे तोटे

SCROLL FOR NEXT