बुलढाण्यात वाघाची दहशत; शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय Saam Tv
महाराष्ट्र

बुलढाण्यात वाघाची दहशत; शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय

बुलढाणा जिल्ह्यात खामगावमध्ये येथे शनिवारी एका वाघाने (Tiger) संचार केल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात खामगावमध्ये (Khamgaon) येथे शनिवारी एका वाघाने (Tiger) संचार केल्याचे एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद (CCTV) झाले आहे. यानंतर वनविभागाने उशीरा कारवाई करत वाघाला पकडण्याकरिता सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मात्र, अंधार्‍या रात्री वाघ वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यामध्ये चांगलाच यशस्वी झाला आहे. त्यानंतर हा वाघ शहरामध्ये आहे किंवा शहराच्या (City) बाहेर गेला याचा थांगपत्ता सध्या लागत नाही. वन विभागाकडून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.

हे देखील पहा-

या सर्व घडामोडीमध्ये खामगाव शहरातील ज्या भागात हा वाघ दिसला होता. त्या परिसरात काही किलोमीटर मधील शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय शाळांकडून घेण्यात आला आहे. आधीच कोरोनामुळे या शाळा बराच काळ बंद होते, आता परत वाघाच्या दहशतीने या शाळा बंद करावे लागले आहेत. खामगाव शहरातील ज्या भागात वाघाचा संचार आढळून आला होता.

त्या भागात शाळा- महाविद्यालय आता वाघ जेरबंद होईपर्यंत बंद असणार आहेत. यामुळे वन विभागाने लवकरात लवकर वाघाचा शोध घेऊन खामगावकरांना वाघाच्या दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी होताना दिसत आहे. वनविभाग वाघ पकडण्याकरिता कसोशीने प्रयत्न करत असले, तरी वाघ पकडल्याशिवाय खामगावात शाळा सुरू होणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता परिसरातील शाळांकडून घेण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वस्तीमध्ये वाघ शिरला होता. वस्तीत वाघ शिरल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी वाघाला पाहिले असून डरकाडी फोडत वाघ हा मार्गक्रमण करत आहे, अशी माहिती वन विभागाला देण्यात आली. अद्याप या वाघाला पकडण्यात यश आले नाही.

पट्टेदार वाघ शहरात शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ हा गेल्या काही महिन्यां अगोदर यवतमाळच्या अभयारण्यामधून दाखल झाला होता. मध्यंतरी हा वाघ बुलढाण्याच्या अभयारण्यामधून दिसेनासा झाला होता, हा तोच वाघ असेल का याबाबत वन विभाग शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : बंगल्यासाठी डान्सरकडून बीडच्या माजी उपसरपंचाचा घात? मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा Video समोर

Cake: गोडाची आवड ठरते घातक, केकचे दुष्परिणाम जाणून घ्या

Navi Mumbai Video : पोलीस अधिकाऱ्यानं रीलच्या नादात काय केलं बघा? VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात

Shrileela Saree Collection: श्रीलीलाच्या ट्रेंडी आणि क्लासिक साड्यांचे कलेक्शन पाहिलेत का? तुम्हीही करु शकता लूक कॉपी

SCROLL FOR NEXT