Three Minor Girls Go Missing Mysteriously from Jalgaon Jamod Bus Stand Saam
महाराष्ट्र

क्लासला जात असल्याचं सांगितलं, बसस्थानकावर गेल्या.. तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरित्या बेपत्ता

Three Minor Girls Go Missing Mysteriously from Jalgaon Jamod Bus Stand: जळगाव जामोद बस स्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची माहिती. तिन्ही मुली १६ वर्षांच्या असल्याची माहिती.

Bhagyashree Kamble

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद बसस्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामोद बसस्थानकातून तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुली 'टेक्निकल क्लासला जात आहोत' असं सांगून घराबाहेर पडले. बसस्थानकावर तिन्ही मुली त्यांच्या मैत्रिणींना दिसल्या. मात्र, त्यानंतर त्या कुठे गेल्या? याचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही.

तिन्ही मुली बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. तिन्ही मुलींच्या पालकांनी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात, 'तीन मुली हरवले आहेत', अशी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहिमेला सुरूवात केली. परंतु, मुलींबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा पोलिसांना मिळालेला नाही.

त्यामुळे मुलींचा शोध घेणे हे जळगाव जामोद पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनलंय. तेजस्विनी गजानन वसुले, सानिका श्रीराम ताडे आणि चंचल श्रीकृष्ण मोहे अशी बेपत्ता असलेल्या मुलींची नावे आहेत. त्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या तिन्ही मुली नेमकं कुठे गेल्या? मुलींसोबत नेमकं काय घडलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या तिन्ही अल्पवयीन मुलींच्या रहस्यमय बेपत्त्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : कोल्हापुरात महाप्रसादातून विषबाधा; २५० पेक्षा अधिक भाविकांना उलट्या-जुलाबाचा त्रास

Non Acidity Pohe Recipe: पित्त न वाढवणारे कांदे पोहे कसे बनवायचे? वाचा सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Kitchen Hacks : किचनमधील चिकट डब्बे कसे साफ करावे? जाणून घ्या सोप्या पद्धती

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद

बीडकरांसाठी खूशखबर, बीड - वडवणीदरम्यान लवकरच रेल्वे धावणार; आज होणार इंजिन चाचणी

SCROLL FOR NEXT