Buldhana Farmers  Saam
महाराष्ट्र

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Heavy Rain Damage: 'सरकारने तात्काळ सरसकट आर्थिक मदत जाहीर करून ओला दुष्काळ घोषित करावा. अन्यथा राज्यातील शेतकरी नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करतील'.

Bhagyashree Kamble

  • सरकारने तात्काळ सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी.

  • ओला दुष्काळ घोषित करावा.

  • शेतकरी नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करतील.

  • शेतकरी आक्रमक.

गेल्या पाच वर्षांपासून शेतकरी सतत होरपळत आहे. कधी सुलतानी संकट तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मात्र, सरकारकडून दिलेली एकही आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत. अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी घास हिसकावून गेला आहे. बुलढाण्यातही संततधार कोसळत आहे. दरम्यान, 'सरकारने मदत करावी, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा', असा गंभीर इशारा सिंदखेडराजा येथील शेतकऱ्यानं दिला आहे.

'सरकारनं तात्काळ सरसकट आर्थिक मदत जाहीर करून ओला दुष्काळ घोषित करावा. अन्यथा राज्यातील शेतकरी नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करतील. शेतकरी आता एकवटले आहेत. शेतकरी आता थांबणार नाही', असा गंभीर इशारा सिंदखेडराजा येथील शेतकरी दिलीप चौधरी यांनी दिला आहे.

बुलढाण्यात संततधार कोसळत आहे. तालुक्यासह जिल्ह्यात तब्बल एक लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसानं झालंय. मात्र, अद्याप कुणी फिरकलेला नाही, किंवा पंचनामे झालेले नाहीत. सरकारचा सेवा पंढरवाडा उपक्रम सुरु आहे. शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली असून मेटाकुटीला आला आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी मलकापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त झाले होते. हजारो शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होऊनही केवळ 400 ते 500 शेतकऱ्यांनाच पीक विमा रक्कम मिळाली. मात्र इतर शेतकरी अद्यापही पीक विमापासून वंचित आहेत. त्यामुळे किसान काँग्रेसने आक्रमक होत मलकापूर तालुका कृषी कार्यालयात गोधडी आणि भजन आंदोलन करत ठिय्या दिला आहे. जोपर्यंत कृषी अधिकारी लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत कृषी कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Bank Roberry : कर्नाटकात SBI बँकेवर सशस्त्र दरोडा, ५८ किलो सोनं अन् ८ कोटी लंपास; महाराष्ट्र कनेक्शन उघड, घराच्या छतावर...

GK: भारतातील कोणकोणती राज्ये अरबी समुद्राला लागून आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai High Court: हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, सर्वांना बाहेर जाण्याच्या सूचना; VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

SCROLL FOR NEXT