Cm EKnath Shinde / Farmers Saam TV
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक पत्रानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच; कर्जाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: राज्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा काय नवीन मुद्दा नाही. महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या पदभार स्विकारताच घोषणा केली होती. मात्र, ऐन पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यतिथ झालेल्या शेतकऱ्यांने टोकाचे पाऊल उचललं. या मुद्द्यावरुन विधानभवनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं होतं. शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला.

याच पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना (Farmers) आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचलू नका, सांगण्यासाठी पत्राद्वारे भावनिक साद देखील घातली होती. तरी देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीयेत. सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांने विष प्राशन करून केली आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यात घडली आहे.

पाहा व्हिडीओ -

लोणारमधील तांबोळा येथील रहिवासी उत्तम धोंडू चव्हाण यांनी सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तम धोंडू चव्हाण हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे ५ एकर कोरडवाहू शेती आहे.

कोरडवाहु शेती हे पावसाच्या भरवशावर असते पण, पावसाच्या लहरीपणामुळे पुन्हा एका शेतकऱ्याला आपला जीव गमावा लागला आहे. चव्हाण यांचे बँकेचे थकीत व उसणवारी सावकारी कर्ज असल्याने कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यानी घातलेली भावनिक साद -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक भावनिक पत्र लिहलं होतं या पत्रामध्ये त्यांनी 'तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आत्महत्या करु नका असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलंय तसंच सरकार कायम बळीराजासोबत असल्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी या पत्रातून दिली होती.

तसंच आपला तोलामोलाचा जीव वाऱ्यावर सोडून जाऊ नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रात म्हटलं होत. तरीदेखील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच सत्र सुरुच असल्याचं चित्र पाहायला मिळंत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT