Buldhana Education Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Education: शिक्षणाचा बोजवारा! विद्यार्थ्यांना शिक्षकांऐवजी मजूर देतात धडे, बुलडाण्यातील भीषण वास्तव

Buldhana News: बुलडाण्यामध्ये शिक्षणाचे भयानक वास्तव समोर आले आहे. बुलडाण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकांऐवजी मजूर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. या मजूरांना २०० रुपये दिले जातात.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी महिला शिक्षकांऐवजी मुलांना मजूर महिला शिक्षणाचे धडे देत आहेत. २०० रुपये रोजंदारीने या महिला मजूर विद्यार्थ्यांना शिकवतात. शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाल संगोपनाच्या नावाखाली दोन शिक्षिका वर्षभरापासून दीर्घ रजेवर आहेत. शिक्षणमंत्री आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणातील चिखली तालुक्यातील शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील २ महिला शिक्षकांनी चक्क २०० रूपये रोजंदारीवर महिलाना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या दोन शिक्षिका बाल संगोपनची रजा घेऊन स्वतःच्या मुलांना उच्चं शिक्षण मिळावे यासाठी लातूरला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .

बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत असल्याचा प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे. मात्र यामुळे इकडे गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी वाऱ्यावर आहेत . अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर असे त्या महिला शिक्षकाचे नाव असून या दोघींनी २०० रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्याना आपल्या जागी शिकवायला दोन महिलांना ठेवले आहे. या संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अनभिज्ञ कसा? असा सवाल पालक वर्ग विचारत आहे.

तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या दोन महिला शिक्षकांविरोधात बऱ्याच वेळेस तक्रारी केल्या आहेत. शिक्षणाधिकारी यांना सांगितले तर तुमच्याकडून काय होते ते करून घ्या अशी उत्तरं पालकांना मिळतात. स्थानिक शिक्षण विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले असून आता या संपूर्ण प्रकाराकडे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीच लक्ष घालून शिक्षण विभागांतील शिक्षकांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT