Buldhana Devotee Dies of Heart Attack Saam TV News
महाराष्ट्र

Pandharpur: चंद्रभागेत आंघोळ अन् धरली पंढरीची वाट, विठुरायाच्या दर्शनाआधीच हार्ट अटॅकनं मृत्यू; परिसरात खळबळ

Buldhana Devotee Dies of Heart Attack: आषाढी एकादशीच्या दिवशी, विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या बुलढाण्यातील एका वारकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

पंढरीच्या वारीत गेलेल्या वारकऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. विठुरायाचं दर्शन घेण्याआधीच मृत्यूने कवटाळल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. वारकरी बुलढाणा येथील रहिवासी असून, याची माहिती कुटुंबाला कळताच त्यांच्यावर दुख:चा डोंगर कोसळला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.

रविवारी सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. मात्र पंढरपुरात एक दुख:द घटना घडली. रामदास पडघान (वय वर्ष ४२) असे वारकऱ्याचे नाव असून, ते बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील कवठळ येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. आषाढी एकादशीनिमित्त ते वारीला गेले होते.

त्यांच्यासोबत गावातील इतरही भाविक होते.रामदास त्या दिवशी चंद्रभागेत आंघोळीला गेले. नंतर मंदिराच्या दिशेनं गेले. मंदिराकडे जात असताना त्यांनी रस्त्याच्याकडे असलेल्या दुकानातून फळे विकत घेतली. काही वेळानंतर त्यांनी तिथेच बसून फळे खाल्ली. दरम्यान, रामदास यांच्या छातीमध्ये वेदना जाणवू लागल्या. त्या खाली कोसळल्या. हे पाहून गावकऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या रूग्णालयात नेलं.

डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नंतर रामदास यांचा मृतदेह गावकरी बुलढाण्यात परतले. रामदास यांचा मृतदेह पाहून पाडघन यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा - मुलगी आणि आई वडील असा त्यांचा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT