Leopard Attack Saam TV
महाराष्ट्र

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; चार लेकरांच्या डोक्यावरून हरपलं पित्याचं छत्र

Buldhana Leopard attack: ज्ञानगंगा अभयारण्यात 500 लोकवास्तीचे देव्हारी नावाचे गाव अस्तित्वात आहे.

Ruchika Jadhav

Buldhana News:

बुलढाण्यातील देव्हारी गावात एक दु:खद घटना घडली आहे. एका तरुण शेतकऱ्यावर बिबिट्याने हल्ला केलाय. या हल्ल्यात बिबट्याने शेतकऱ्याच्या मानेचा लचका घेतला. त्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ज्ञानगंगा अभयारण्यात 500 लोकवस्तीचे देव्हारी नावाचे गाव अस्तित्वात आहे. या गावातील लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शनिवारी दुपारच्या वेळी सुनील झीने हा तरुण शेतात काम करत होता. यावेळी दबक्या पावलांनी बिबट्या त्याच्या समोर आला. सुनीलला काही करता येणार तोच बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.

जीव वाचवण्यासाठी त्याने आरडाओरडा केला. सुनीलचा आवाज ऐकून गावातील नागरिक धावपळ करत शेतात पोहचले. माणसांचा घोळका येताना पाहून बिबट्याने धूम ठोकली. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. कारण बिबट्याने सुनील झीनेवर हल्ला करत त्याच्या मानेचा चावा घेतला होता. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

पित्याचं छत्र हरपलं

सुनील झीने विवाहित होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. पतीच्या निधनाने पत्नीवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळलाय. तसेच पित्याचे छत्र हरपल्याने मुलांनी देखील टाहो फोडला.

जबाबदार कोण?

मागील महिन्यात देखील बिबट्याने एका महिलेवर असाच हल्ला केला होता. देव्हारी गावचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आलेय. ज्ञानगंगा अभयारण्यात असंख्य हिंस्र प्राणी आहेत. राखीव जंगल असल्याने देव्हारी गावचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. आता सुनील झीनेचे कुटुंबं उघड्यावर पडले असून शासणाने तातडीने मदत करावी अशी मागणी ग्रामस्तांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

Screen time effects on kids: वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय चिडचिडेपणाची समस्या; कसं कराल स्क्रीन टाईम मॅनेजमेंट?

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT