Crime News Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Crime: बुलढाण्यात सशस्त्र दरोडा, कुटुंबाला बेदम मारहाण करत लाखोंचा ऐवज लुटला; परिसरात खळबळ

Crime News: दरोडेखोरांनी पती, पत्नीसह मुलाला मारहाण करत 2 लाखाचे सोने व 20 हजारांचा ऐवज लुटला. मारहाणीमध्ये कुटुंबातील चौघेही गंभीर जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. १६ डिसेंबर २०२३

Buldhana Crime News:

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील वाघजाळ या गावात सशस्त्र दरोडा पडला असून पती, पत्नीसह मुलाला मारहाण करत 2 लाखाचे सोने व 20 हजार रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील (Buldhana) वाघजाळ गावात शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी पती, पत्नीसह मुलाला मारहाण करत 2 लाखाचे सोने व 20 हजारांचा ऐवज लुटला. मारहाणीमध्ये कुटुंबातील चौघेही गंभीर जखमी झाले आहेत.

या भयंकर घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा गावात दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या गावात दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, दिवाळीमध्ये मोताळा शहरात चार ते पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या.त्यातील अद्याप पर्यंत आरोपी सापडले नाहीत. अशातच आता पुन्हा एकदा दरोड्याची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT