Buldhana 34 Year Old Woman Rajur Ghat Rape Case  Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Crime News: राजूर घाट सामूहिक अत्याचार प्रकरणाला नवे वळण; पीडित महिलेचा धक्कादायक खुलासा

Buldhana Rajur Ghat News: याप्रकरणी पीडित महिलेसोबत असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाला आता वेगळीच कलाटी मिळाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Rajur Ghat Women Molestation Case: बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजुर घाटात एका ३४ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा कथित प्रकार शुक्रवारी (ता. १४ जुलै) दुपारच्या सुमारास घडला होता. हे वृत्त पसरतात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.

याप्रकरणी पीडित महिलेसोबत असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाला आता वेगळीच कलाटी मिळाली आहे. कारण पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचा खुलासा केला आहे.

माझ्यावर कोणतही लैंगिक अत्याचार झाला नाही, असं महिलेने पोलिसांना (Police) सांगितलं. आरोपींनी फक्त आमच्याकडील पैसे, मोबाईल काढून घेतले. त्याचबरोबर आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली, त्यानंतर ते निघून गेले, असंही महिलेने पोलिसांना सांगितलं आहे.

माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेलाच नाही . त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीची ही गरज नाही. असंही या महिलेने पोलिसांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना लिहून दिलं असल्याची माहिती बुलढाण्याचे उप विभागीय पोलिस अधिकारी गुलाबराव वाघ यांनी माध्यमांना दिली.

नेमकं काय आहे प्रकरण?

बुलढाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटात (Buldhana News) पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. गुरूवारी दुपारच्या सुमारास एक महिला आपल्या मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आली होती.

यावेळी दोघेही देवीच्या परिसरात ते थांबले असताना अचानक ८ जणाचं टोळकं तिथे आलं. महिलेच्या मित्राला मारहाण करत या टोळक्याने चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रक्कम काढून घेतली.

इतकंच नाही, तर आरोपींनी महिलेला दरीत ओढत नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला, अशी तक्रार तिच्यासोबत असलेल्या पुरूष मित्रांनी पोलिसांना दिली होती. दरम्यान, ही घटना उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसलळी होती.

बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोरखेडी पोलीस ठाण्यात ३ तास ठिय्या मांडून गुन्हा दाखल करून घेतला होता. आमदार महोदयांनी पोलीस अधिकाऱ्यांना व पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र, या प्रकरणाला आता वेगळीच कलाटी मिळाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

SCROLL FOR NEXT