Buldhana Crime News Saam Digital
महाराष्ट्र

Buldhana Crime News: बुलडाणा हादरलं! चॉकलेटचे आमिष दाखवून तरुणाकडून अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार

Buldhana Crime News: बुलडाणा जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

संजय जाधव

Buldhana Crime News:

बुलडाणा जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच आरोपीने पीडितेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित बालिकेची तब्येत खालावली आहे. तिला उपचारासाठी अकोला येथील वैद्यकीय उपचारार्थ भरती करण्यात आल आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

बुलडाणा जिल्ह्यातील बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात अडीच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉकलेटचे आमिष देऊन सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाने बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार केला आहे. तसेच तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. बालिका बेशुद्ध झाली, मात्र तिला मृत समजून आरोपीने पलायन केले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना घरातून आवाज आला.

त्याने घराची कडी उघडून पाहिल्यानंतर पीडित बालिका दिसून आली. त्यावेळी तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बोरखेडी ठाणेदार बळीराम गिते पथकासह गावात दाखल झाले. आरोपीची माहिती या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी बोराखेडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बालिकेची तब्येत गंभीर आहे. या बालिकेला अकोला येथील रुग्णाल्यात भरती करण्यात आलं आहे.

नातवाकडून आजीची डोक्यात दगड घालून हत्या

72 वर्षीय आजीच्या डोक्यात दगड घालून नातवाने आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथे उघडकीस आली आहे. कौशल्याबाई किसन राऊत ( 72) असं मृत महिलेचे नाव आहे.

नातू राहुल बाळासाहेब राऊत याच्याशी घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. याचा राग मनात धरून राहुल याने आजी कौशल्याबाई राऊत यांची डोक्यात दगड घालून हत्या केली. या प्रकरणी नातवाविरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT