Buldhana Crime news owner killed cow not giving milk Khamgaon taluka ghanegaon village shocking incident  Saam TV
महाराष्ट्र

Buldhana Crime News: दूध न दिल्याच्या रागातून मालकाने केली गायीची हत्या; खामगाव तालुक्यातील संतापजनक घटना

Khamgaon Crime News: दूध न दिल्याने संतापलेल्या मालकाने गायीला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गायीचा जागीच मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana News Today: बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दूध न दिल्याने संतापलेल्या मालकाने गायीला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गायीचा जागीच मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातल्या घाणेगाव परिसरात बुधवारी ही घटना घडली. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. (Buldhana Crime News Owner killed Cow Not Giving Milk Khamgaon Taluka Ghanegaon Village Shocking Incident)

याप्रकरणी पीपल फॉर ॲनिमल या संघटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) आरोपी मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील रमेश अहिर असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हा शेती करतो. त्याच्याकडे एक संकरीत जातीची गाय होती.

बुधवारी सुनील हा गायीचे दूध काढण्यासाठी शेतात (Buldhana News) गेला असता, गायीने त्याला दूध काढू दिले नाही. यावर सुनीलला राग अनावर झाला. त्याने काठीने गायीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गायीचा मृत्यू झाला. हत्येनंतर त्याने गायीचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला. (Latest Marathi News)

दरम्यान, या घटनेची माहिती खामगाव येथील पीपल फॉर ॲनिमल या संघटनेच्या अध्यक्षा सुनिता आयलानी यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याचा हा क्रूर प्रकार सर्वांसमोर आणला. घटनास्थळावरून तक्रारकर्त्या महिलेने केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Breaking Marathi News)

याप्रकरणी सुनिता आयलानी यांनी पिंपळगावराजा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनील रमेश अहिर याच्याविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम त्याचबरोबर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे (Crime News) दाखल केले आहेत. दूध न दिल्याने मालकाने गायीची हत्या केल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT