Buldhana Crime News MLA Sanjay Gaikwad warning to gangster in Mehkar Saam TV
महाराष्ट्र

Buldhana News: दिवाळी नसती तर एकेकाचे तुकडे केले असते; 'त्या' घटनेनं आमदार संजय गायकवाड भडकले; नेमकं काय घडलं?

Buldhana Crime News: मेहकर शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने धार्मिक कारणावरून राडा केला, यावरुन आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Crime News

राज्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात असताना बुलढाणा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली. मेहकर शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने धार्मिक कारणावरून राडा केला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतकंच नाही, तर अल्पवयीन मुलीच्या मदतीसाठी आलेल्या लोकांना देखील या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत टोळक्याला अटक केली. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर, आमदार संजय गायकवाड शेकडो कार्यकर्ते घेऊन मेहकरात पोहचले.

आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) मेहकर पोलिसांवर चांगलेच संतापले. तुम्ही गुंडांवर गुन्हे दाखल केले असले, तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांची जमानत झाल्यावर मी त्यांना तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला.

घटना नेमकी काय?

तक्रार महिला आमदार संजय गायकवाड यांच्या भाची आहेत. त्या मेहकर शहरातील (Buldhana News) रहिवासी असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेसात वाजता त्या परिसरातील महिलांसह देवदर्शनासाठी मंदिरात जात होत्या. यावेळी अचानक २० ते २५ जणांच्या टोळके हातात लाठ्या काठ्या घेऊन महिलांना आडवे आले. त्यातील एका आरोपीने १५ वर्षीय मुलीसमोर फटाका फोडला, अश्लील हावभाव करून मुलीची छेड काढली.

इतकंच नाही, तर आरोपींनी तक्रारदार महिलेच्या अंगावरील १ तोळा सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले. त्यांनी महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा त्यांचा मुलगा आणि त्याचा मित्र धावत आला. पण टोळक्याने त्या दोघांनाही बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसह मेहकरात पोहचले. यावेळी घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. जर दिवाळी नसती तर एकेकाचे तुकडे केले असते. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी माझा हिशोब बाकी आहे, असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT