buldhana crime संजय जाधव
महाराष्ट्र

बुलढाणामध्ये 3 तरुणांनी हातात तलवारी घेऊन नाचल्याचा Video viral; पोलीस आले अन्…

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बुलढाणा शहर पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल करत ३ आरोपींना अटक करण्यात आली

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा: हातामध्ये तलवारी घेऊन नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होताच बुलढाणा (Buldhana) शहर पोलिसांनी (police) १० जणांवर गुन्हा दाखल करत ३ आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली आहे. लेमन उर्फ संजय काळे, अमित बेडवाल, पवनसाठे असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपींचे (accused) नावे आहे. २० फेब्रुवारी दिवशी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास शहरामधील क्रांती चौकात लाऊड स्पीकरवर गाणे लावून तलवारी (Sword) घेऊन हे तरुण नाचत होते. (buldhana crime news case against 10 for dancing with swords)

हे देखील पहा-

याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) लाइव्ह वेबकास्टच्या माध्यमातून व्हायरल झाल्यावर व्हिडिओ मधील युवकांचे पडताळणी करत बुलढाणा शहर पोलिसांनी (police) कारवाईला सुरवात केली आहे. बुलढाणा पोलीस स्थानकामधील उपनिरीक्षक दिलीप पवार, एएसआय माधव पेटकर, पोलीस हेड कॉनस्टेबल सुनिल जाधव, पो कॉन्सटेबल उमेश घुबे, चालक पोलीस हेड कॉनस्टेबल रमेश वाघ यांनी लगेच क्रांती चौकात धाव घेतली. पोलिसांना बघून नाचणाऱ्यांनी पळापळ सुरु केली. यामध्ये लखन साठे, पवन साठे, सुनील काळे यांच्या हातात तलवारी दिसून आले होते.

या प्रकरणी एएसआय माधव पेटकर यांच्या तक्रारीवरुन लखन साठे, पवन साठे, सुनील उर्फ लेखन काळे, अमित बेंडवाल, निशांत श्रीवास्तव व इतर ८ ते १० जणांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय काळे, अमित बेडवाल, पवन साठे या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश लोधी हे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

SCROLL FOR NEXT