Ahmednagar Crime: धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर तालुक्यात घारगाव महावितरणच्या एका वायरमनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली
Ahmednagar Crime: धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Ahmednagar Crime: धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्यागोविंद साळुंके

अहमदनगर: संगमनेर (Sangamner) तालुक्यात घारगाव महावितरणच्या (MSEDCL) एका वायरमनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (self slaughter) केली आहे. प्रदीप शांताराम कडाळे (वय- २५) रा. कडाळेवस्ती, घारगाव, ता. संगमनेर असे या वायरमनचे नाव आहे. पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, कडाळे हे नेहमीप्रमाणे घारगाव महावितरण येथे कार्यरत होते. अकलापुर (Akalapur) रोड येथील एका कॉम्प्लेक्समध्ये ते राहण्यास होते. (Ahmednagar MSEDCL employee commits self slaughter by strangulation)

हे देखील पहा-

गुरुवारी रात्री १२:३० वाजेच्या दरम्यान कडाळे यांनी बेडरूमचा दरवाजा लावला ते दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या पत्नी पूजा यांनी कडाळे यांच्या मित्रांना फोनवरून कळविले. मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कडाळे यांच्या मित्रांनी (friends) दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता. कडाळे यांनी बेडरूम मधील फॅन लटकवण्याच्या लोखंडी हुकाला कापडी बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आढळून आले. त्यानंतर पोलीस (police) ठाण्यामध्ये या घटनेची खबर देण्यात आली.

Ahmednagar Crime: धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Hingoli Farmer: चिंताजनक! हिंगोलीत 2 तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय विखे, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, चालक नामदेव बिरे यांनी जाऊन पाहणी करून, पंचनामा करण्यात आला मृतदेह खाली घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात (hospital) कडाळे यांंचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. वायरमन कडाळे हे या ठिकाणी पत्नीसोबत दोघेच राहत होते. कडाळे यांनी आत्महत्या का केली, याविषयी कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गणेश विठ्ठल लेंडे (वय-२५, रा. खंदरमाळ) यांनी दिलेल्या माहितीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com