Buldana News saam tv
महाराष्ट्र

Buldana News: बुलढाणा हादरलं! खाऊ देतो म्हणून घेऊन गेला अन्... चिखलीतील 'त्या' चिमुकलीसोबत घडलं भयानक कृत्य

Buldana News: अखेर घटनेच्या चौथ्या दिवशी पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे.

Chandrakant Jagtap

>> संजय जाधव, साम टीव्ही

Chikhli News: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सहा वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. चिखली तालुक्यातील रोहडा येथे तपोवन देवी संस्थानात आपल्या आई वडिलांसोबत लग्नाला आलेल्या या चिमुकलीची का आणि कुणी हत्या केली असा प्रश्न जो तो विचारत होता. या हत्येने समाजमन सुन्न झाले होतं.

अखेर घटनेच्या चौथ्या दिवशी पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. रोहडा गावातीलच एका 24 वर्षीय नराधमाने या चिमुकलीला खाऊ देण्याच्या पाहण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासातून समोर आला आहे. एवढंच नाही तर केलेले कृत्य कुणाला कळू नये म्हणून आरोरीने रुमालाने चिमुकलीचा गळा आवळून तिची हत्या केली. या घटनेने बुलढाणा हादरलं आहे.

गेल्या चार दिवसापासून पोलीस या नराधमाच्या शोधात होते. वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी केल्यानंतर शेवटी या नराधमाने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच शवविच्छेदन अहवालातून पीडित 6 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे लोकांकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. आरोपी तरुण 24 वर्षांचा असून तो रोहडा गावातीलच असल्याचं समोर आले आहे. अंढेरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (Crime News)

दरम्यान बाळापूर येथील मूळ निवासी असलेले कुटूंब आपल्या परिवारासह एका लग्नानिमित्त चिखली परिसरात आले होते. गेल्या शुक्रवारी तपोवन देवी मंदिर परिसरातून त्यांची 6 वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाली होती. त्यानतंर दुसऱ्या दिवशी मंदिरामागील परिसरातील तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone 17 Launch In India: १९ सप्टेंबरपासून iPhone 17 बाजारात विक्रीसाठी दाखल, जाणून घ्या खास अन् दमदार ऑफर्स

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT