Buldhana Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, मुलीची प्रकृती गंभीर

Sangrampur Buldhana Crime News: बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूणकी गावामध्ये राहणाऱ्या ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये ४ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील टूणकी गावात ही घटना घडली. चिमुकलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपीला सोनाळा पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूणकी गावामध्ये राहणाऱ्या ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. २१ वर्षीय तरुणाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे. चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिमुकलीला जवळपास १५ ते १७ टाके लागल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिसांनी मध्यप्रदेशमधील सुनील कालुसिंग निगवाले या आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सोनाळा पोलिस करत आहेत. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ वॉर्डमध्ये चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती गंभीर आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

Phone Pe Update : आता इंटरनेट नसतानाही पाठवा पैसे; PhonePe ची भन्नाट सुविधा

PM Modi: परदेशात जाणं टाळा, सोनं खरेदी करु नका; PM मोदींच्या 'त्या' व्हिडीओनंतर देशवासीय पुन्हा संभ्रमात

हादरवणारी बातमी! जापानमध्ये हिंगोलीच्या २५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं झालं काय?

10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

SCROLL FOR NEXT