Buldhana Cotton fire News
Buldhana Cotton fire News saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : पांढरं सोनं क्षणार्धात काळं झालं! वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याच्या स्वप्नांचा कोळसा'

संजय जाधव, साम टीव्ही

Buldhana Cotton fire News : वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचं लाखोंच नुकसान झाल्याची घटना बुलडाण्यात घडली आहे. येथील एका शेतकऱ्याने योग्य भाव न मिळाल्याने 160 क्विंटल कापूस एका गोडाऊनमध्ये ठेवला होता. परंतु गोडाऊनवरून गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या विद्यूत वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अख्खा कापूस जळून खाक झाला आहे. या आगीत शेतकऱ्याचं 16 लाखांचं नुकसान झालं आहे.

कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात अनेक शेतकऱ्यांनी तो न विकता घरातच ठेवला आहे. योग्य भाव कधी मिळेल या प्रतिक्षेत कापूस उत्पादक शेतकरी आहेत. परंतु बुलडाण्यातील गुगळी गावातील शेतकऱ्याला आपला कापूस तसाच ठेवणे महागात पडले आहे. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे या शेतकऱ्यांचा लाखोंचा कापूस जळून खाक झाला. विजय विष्णू खडके असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील गुगळी गावातील विजय खडके या शेतकऱ्याने कापसाला भाव मिळत नसल्याने एका गोडाऊन मध्ये 160 क्विंटल कापूस जमा करून ठेवला होता. या गोडाऊनवरून वीज वितरण कंपनीची वायर गेलेली आहे. या वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने कापसावर ठिणग्या पडल्या आणि कापसाला आग लागली. (Buldhana News)

कापसाला आग लागल्याचं लक्षात येताच विजय खडके यांनी ती आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला. अतिशय कमी वेलात त्यांनी विहिरीतील पाणी आणून कापसावर टाकले. मात्र तोपर्यंत कापूस जळून खाक झाला. या घटनेत विजय खडके यांचं 16 लाख रुपयाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून शासनाने विजय खडके या शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT