Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Chikhali : घराचे काम करताना भिंत कोसळली; बाप लेकांचा दबून मृत्यू, दोन मजुर जखमी

Buldhana News : शेलोडी येथील दामोदर घाडगे यांचे जुने घर असून या जुन्या घराचे माळवद पाडून तेथे घाडगे यांना नव्या घराचे बांधकाम सुरु करावयाचे होते त्यासाठी माळवद पाडण्याचे काम दिले होते

संजय जाधव

बुलढाणा : जुने घर पडून नवीन घराचे बांधकाम सुरु करण्यात येणार होते. या अनुषंगाने जुन्या घराच्या भिंती अर्थात माळवद पाडण्याचे काम सुरु करण्यात येत होते. काम सुरु असताना अचानकपणे माळवद कोसळले. यावेळी येथे उभे असलेल्या वडील आणि मुलाचा दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. 

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामधील शेलोडी या गावात सदरची घटना घडली आहे. यात शालिग्राम वाळूस्कर (वय ६५) आणि त्याचा मुलगा योगेश वाळूस्कर (वय ३२) यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शेलोडी येथील दामोदर घाडगे यांचे जुने घर असून या जुन्या घराचे माळवद पाडून तेथे घाडगे यांना नव्या घराचे बांधकाम सुरु करावयाचे होते त्यासाठी त्यांनी माळवद पाडण्याचे काम गावातीलच शालिग्राम वाळूस्कर यांना दिले होते. 

लाकडांसह भिंत कोसळली  

ठरल्यानुसार आज सकाळी शालिग्राम वाळूस्कर यांच्यासह त्यांचा मुलगा योगेश, राम घाडगे व सुनील नेमाने असे चौघेजण माळवाद पाडण्याचे काम करत होते. मात्र घर खूप जुने असल्याने जीर्ण झालेल्या घराचे माळवद जुन्या लाकडांसह काम करत असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळले. यात शालिग्राम वाळूस्कर आणि त्याचा मुलगा योगेश वाळूस्कर हे दोघेजण दबले गेले. यात त्यांचा मृत्यू झाला. 

दोन जण जखमी 

माळवद पाडण्याचे काम करण्यासाठी चौघेजण होते. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर राम घाडगे आणि सुनील नेमाने हे दोघे मजूर जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांनी धाव घेत सर्वाना बाहेर काढले. यानंतर जखमी असलेल्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून सध्या त्यांच्यावर चिखली येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला, उभ्या पिकांवरून फिरवला नांगर

Heart attack: एखादी व्यक्ती किती हार्ट अटॅक झेलू शकते?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा, पैसे आले की नाही कसे चेक कराल?

Gold Rate Today : सोनं अचानक स्वस्त! आठवडाभरात ₹10,000 ची घसरण, आजचा भाव किती? वाचा...

Raw Nutmeg: कच्चे जायफळ खाण्याचे भन्नाट फायदे; डोकेदुखी कमी होण्यासोबत शरीराला इतरही होतील फायदे

SCROLL FOR NEXT