Buldhana Accident News:  saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident: भीषण अपघात! कंटेनर- दुचाकीची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Buldhana News: बुलढाण्यातील नागपूर पुणे मुंबई महामार्गावर दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक अपघात स्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा|ता. ३ मार्च २०२४

Buldhana Accident News:

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. आज बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील नागपूर पुणे मुंबई महामार्गावर दुचाकी व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज बुलढाण्यामध्ये (Buldhana) एक भीषण अपघाताची घटना घडली. नागपूर पुणे मुंबई महामार्गावर अंजनी खुर्द गावा जवळ कंटेनर आणि दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. रामेश्वर कांबळे व पंडित भरसाखले असे या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भयंकर होता की दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर कंटेनर चालक अपघात स्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार दळवींच्या गाडीला अपघात..

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना काल घडली. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे हा अपघात झाला. या अपघातात आमदार दळवी सुखरुप आहेत. पण एका मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Maharashtra News Live Update: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता?

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

Godrej Professional Vibe Collection: मुंबईत लॉन्च झालं नवीन हेअर कलर कलेक्शन; 1000 हून अधिक हेअर स्टायलिस्ट्सना मिळणार नोकरी

SCROLL FOR NEXT