Buldhana Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident : केळीने भरलेला ट्रक पलटी; दोन मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर

Buldhana News : जळगाव जामोद रस्त्याकडून केळीने भरून टूनकी कडे येत असलेले आयशर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याने भीषण अपघात झाला

संजय जाधव

बुलढाणा : शेतकऱ्याच्या शेतातून केळीची कापणी केल्यानंतर व्यापाऱ्याने खरेदी केलेली केळी ट्रकमध्ये भरून मार्केटमध्ये नेण्यात येत होती. मात्र टुनकी ते सोनाळा या मार्गावर केळीने भरलेला हा ट्रक पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकवर बसलेल्या दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुनकी ते सोनाळा या मार्गावर सदरचा अपघात घडला असून रात्री ९ वाजताच्या सुमारास हि घटना घडली. जळगाव जामोद रस्त्याकडून केळीने भरून टूनकी कडे येत असलेले आयशर वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. या अपघातात निलेश तेजराव चव्हाण (वय ४०) व बाळू रायबोले (वय ४२) या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.  

पाच मजुर जखमी 

दोघांचा मृत्यू झाला असून पाच मजूर जखमी झाले आहेत. यात गुणवंत रामदास चव्हाण (वय ३५), हरीश रामदास चव्हाण (वय २२), वनदेवराव जगनराव वानखडे (वय ४२), शाहीद खा मुनदर खा पठाण (वय ३८), ईद्रीस खा इब्राहिम खान (वय ४०) हे पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सर्व जखमी अंजनगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अपघातानंतर वाहतूक खोळंबली 

या घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. अपघातानंतर बराच वेळ घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तर पोलीसांनी लोकांना बाजूला सावरत तातडीने वाहतुक पूर्ववत सुरळीत केली. याबाबत काल रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता या घटनेचा पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापणार

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT