विविध मागण्यांसाठी बसपाचे वर्ध्यात धरणे आंदोलन  सुरेंद्र रामटेके
महाराष्ट्र

विविध मागण्यांसाठी बसपाचे वर्ध्यात धरणे आंदोलन

महागाई, इंधन दरवाढ, पदोन्नती आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षण आदी मुद्द्यांवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरेंद्र रामटेके 

वर्धा : बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. वर्ध्यात देखील बसपाच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. महागाई, पदोन्नती आरक्षण, ओबीसीचे राजकीय आरक्षण आदी मुद्द्यांवर विविध मागण्या घेऊन केंद्र व राज्य सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. या धरणे आंदोलनाला मोठ्या संख्येने बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.BSP's agitation in Wardha for various demands

हे देखील पहा -

महाराष्ट्रातील एससी/एसटी कर्मचाऱ्यांचे रद्द झालेले पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा लागू झाले पाहिजे. तसेच महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेचार लाख कर्मचाऱ्यांची पूर्ण भरती केली पाहिजे, त्यासोबतच ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण लागू झाले पाहिजे, कोरोनाच्या काळामध्ये मृत्युमुखी पावलेल्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे यासोबतच पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी करावे, खाद्यतेलाचे भाव कमी करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

महागाईने कळस गाठलेला असून गॅस सिलेंडरची दरवाढ कमी केली पाहिजे. त्यासोबतच प्राध्यापकांची भरती बिंदुनामावलीनुसार केले गेली पाहिजे. या मागण्या घेऊन बसपाने धरणे आंदोलन केले. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती महोदयांनी आणि मुख्यमंत्र्यांना पाठविले असल्याचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक मोहन राईकवार यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut At Dasara Melava: या शिवतीर्थाच्या पलीकडे अजून एक शिवतीर्थ; संजय राऊतांचं महत्वपूर्ण विधान|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: दिल्लीतील रावणाला जाळायचं आहे - संजय राऊत

Badlapur Tourism : शहराच्या धावपळीपासून दूर वसलंय निसर्गरम्य ठिकाण, वीकेंडला बदलापूरला ट्रिप प्लान करा

Ravan Dahan: वरुणाराजाच्या माऱ्यापुढे राक्षस राजाची हार; वादळी पावसानं उडवलं मुडकं, तर कुठं रावणनं घेतली झोप

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

SCROLL FOR NEXT