Brutal murder of a young man by stabbing In Nashik Filed a crime against the gang तबरेज शेख
महाराष्ट्र

Nashik Crime : चाकूचे वार करत तरुणाची निर्घृण हत्या; टोळक्याविरोधात गुन्हा दाखल

Nashik Crime News : त्याने एक वर्षांच्या मुलाचा वाढदिवस नुकताच साजरा केला हाेता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक: म्हसरुळ (Mhasrul) येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नाशिकच्या (Nashik) म्हसरुळ परिसरात असलेल्या आकाश पेट्राेल पंपाजवळील सावकार गार्डन याठिकाणी एका २५ वर्षीय तरुणाची एका टोळक्याकडून धारदार शस्त्रांनी हत्या (Murder) करण्यात आली. रात्री अकरा वाजता पाच जणांच्या टाेळक्याने २५ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. (Brutal murder of a young man by stabbing In Nashik Filed a crime against the gang)

हे देखील पाहा -

या घटनेत मृत तरुणाचा मित्र थोडक्यात बचावला आहे. हल्लेखोर टोळक्याच्या (Gang) तावडीतून निसटून आल्यावर त्याने घटनेची माहिती दिली. याबाबत म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यश रामचंद्र गांगुर्डे (24, रा. राजवाडा, म्हसरुळ) असे मृताचे नाव आहे. मृत यश हा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत हाेता. तर फरशी बसवण्याचेही काम करत हाेता, अशी माहिती समाेर आली आहे. त्याने एक वर्षांच्या मुलाचा वाढदिवस नुकताच साजरा केला हाेता.

यश आणि त्याचा मित्र बुधवारी रात्री पावणे अकरा ते अकराच्या सुमारास सावकार गार्डन जवळून जात असताना संशयित दीपक पगारे आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांनी त्या दोघांना अडवून वाद घातला. त्यानंतर चाॅपरने वार करुन यशची हत्या केली. त्याचवेळी यशचा मित्र घटनास्थळावरुन निसटून आला. त्याने घटनेची ओरड करुन कुटुंबाला माहिती दिली. त्यानंतर सहायक आयुक्त मधुकर गावित, म्हसरुळचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशाेक साखरे आणि गुन्हे शाेध पथक दाखल झाले. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी म्हसरुळ राजवाड्यातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली हाेती. एकूणच नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढताना दिसत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT