Crime News SaamTV
महाराष्ट्र

Crime News: जुना वाद टोकाला गेला, कुऱ्हाडीनं १ घाव अन् २ तुकडे केले; नंदुरबार हादरलं

Crime Farm Labour killed: शेतीच्या वादातून संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मजुराला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर धारदार कुऱ्हाडीनं हल्ला केला. मजुराचा जागीच मृत्यू

Bhagyashree Kamble

एक भयानक हत्याकांडाची घटना समोर आली आहे. एका मजुराची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पूर्वी घडलेल्या शेतीच्या वादातून संतप्त गावकऱ्यांनी मजुराला आधी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर धारदार कुऱ्हाडीनं हल्ला करत संपवलं.

ही धक्कादायक घटना नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील बिललगावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील बिललगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या शेतीच्या वादातून एका मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. फाड्या खाज्या पावरा (वय वर्ष ४०) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबारचा मजुर पंढपुरात गेला होता.

नंतर दुसऱ्या दिवशी तो आपल्या गावी परतला. सकाळी तो नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला. त्या ठिकाणी काही गावकरी आले. पूर्वी झालेल्या शेतीच्या वादाचा राग अजूनही त्या गावकऱ्यांच्या मनात खदखदत होता. रागाच्या भरात गावकऱ्यांनी मजुराला घेरलं.

आरोपींनी आधी मजुराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर धारदार कुऱ्हाडीनं जोरात हल्ला केला. या हल्ल्यात मजुराचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर ३ आरोपी फरार झाले आणि मृतदेह नदीजवळ पडून होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास करत ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मृत्युदेह शवविच्छेदनासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : एनसीपीए आणि एजिलच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; बोनस जाहीर

सांगलीत रोहित पाटलांना जोरदार धक्का, पडळकरकरांनी गुलाल उधळला, संजयकाका पाटलांचा विजय; सुमनताई पाटलांचा १ मताने पराभव

Western Railway: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा! पश्चिम रेल्वेवर १७ नव्या मेल-एक्स्प्रेस धावणार; दादर-जोगेश्वरीतून होणार सुरुवात

Milk Cake Recipe: सणासुदीला बनवा घरच्या घरी दाणेदार आणि स्वादिष्ट मिल्क केक, वाचा सोपी रेसिपी

Glenn Maxwell: 'बिग शो'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम! ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT