Beed Politics Saam tv
महाराष्ट्र

Beed Politics: गुलाबी वादळात धनंजय मुंडेंना उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही; 'बीआरएस'च्या नेत्याचे थेट आव्हान

विनोद जिरे

Beed News: 'बीड जिल्ह्यातील राजकारण हे सुडाचं राजकारण आहे. वंचितमध्ये काम करत असताना भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतला म्हणून मला धनंजय मुंडेंनी 6 महिने जेलमध्ये घातलं. मात्र आता 'बीआरएस'च्या गुलाबी वादळात धनंजय मुंडेंना उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असं थेट आव्हान 'बीआरएस'च्या पक्षाचे राज्याचे समन्वयक शिवराज बांगर यांनी दिलं आहे. (Latest Marathi News)

बीडच्या गेवराईत खासदार बी.बी. पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. या कार्यक्रमाला 'बीआरएस'च्या पक्षाचे राज्याचे समन्वयक शिवराज बांगर यांनी उपस्थितांना संबोधित केले. 'तुम्ही अहमदाबादची गुलामी करा, आम्ही हैदराबादचा विकास महराष्ट्रात आणू, असंही बांगर यांनी यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र तेलंगणाचा बीआरएस पक्ष गुलाबी वादळ करत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मस्के यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सभापतींनी बीआरएस पक्षांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.

या कार्यक्रमात बांगर म्हणाले, 'या मतदारसंघांमध्ये कोणी लोकांच्या हिताचं काम करण्याचा शेतकऱ्यांच्या हिताचं काम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला खोट्या गुन्ह्यात गोवलं जातं. त्याला त्रास दिला जातो. त्याला आर्थिकदृष्ट्या संपवलं जातं'.

'मागच्या 2 वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान गडाच्या पायथ्याशी मी ऊसतोड कामगारांचा मेळावा घेतला. मात्र तो मेळावा घेतल्यामुळे मला 6 महिने त्यावेळी पालकमंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंनी जेलमध्ये घातलं. आताही ते मंत्री झालेत. मात्र आता या बीआरएसच्या गुलाबी वादळात धनंजय मुंडेंना उखडून फेकल्याशिवाय राहणार नाहीत, असं थेट आव्हान भारत राष्ट्र समिती समन्वयक शिवराज बांगर यांनी जाहीर भाषणातून दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avneet Kaur: गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... अवनीतचा हटके अंदाज

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने थकवा

PM Modi : वर्ध्यातून मोदींनी मविआवर डागलं टीकास्त्र

Buldhana News : दारूबंदी, अवैध धंद्याच्या विरोधात महिलांचा एल्गार; पोलीस स्टेशनला संतप्त महिलांची धडक

Bigg Boss Marathi च्या घरातील सर्वाधिक गाजलेली जोडी कोणती?

SCROLL FOR NEXT