दोन हजारांसाठी भावानेच केला भावाचा खून; आरोपी अटकेत Saam Tv
महाराष्ट्र

दोन हजारांसाठी भावानेच केला भावाचा खून; आरोपी अटकेत

दोन सख्ख्या भावंडात कडाक्याचं भांडण झालं.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर: तालुक्यातील गातेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कासार जवळा या गावातील नागनाथ आश्रुबा सुडके आणि वैजनाथ आश्रुबा सुडके या दोन भावांमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये हप्त्याची रक्कम पत्नीला दिली. या कारणावरून दोन सख्ख्या भावंडात कडाक्याचं भांडण झालं. या भांडणांमध्ये आरोपी नागनाथ सुडके यांनी त्याचा भाऊ वैजनाथ सुडके यांचा डोक्यामध्ये काठीने वार केला त्यामध्ये वैजनाथ सुडके हा गंभीर जखमी झाला.

हे देखील पहा-

त्याला उपचारासाठी लातूरच्या Latur शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताच्या मामाच्या फिर्यादीवरून गातेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून बारा तासाच्या आत गातेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी दोन पथके आरोपीच्या शोधात पाठवली.

पोलीस निरीक्षक विलास नवले आणि पोलीस उप निरीक्षक नंदकिशोर कांबळे आणि त्यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर कांबळे हे करीत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकून, जालना हादरलं

Bihar Election Result: कधीपासून सुरू होणार EVM मतमोजणी; कशी असणार मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था?

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT