अकोला - एका तरुणानं आपल्या भावाच्या निधनानंतर आपल्या वहिनीला आणि आपल्या पुतण्यांना मोठा आधार दिलाय. या तरुणाला त्याच्या विधवा वहिनीचं आणि पुतण्यांचे दुःख पाहवत नव्हते, म्हणून त्याने एक पुरोगामी निर्णय घेत आपल्या विधवा वहिणीसोबत लग्नगाठ (Marriage) बांधली. या निर्णयाचे सर्वत्र त्याचे कौतुक होतंय. दरम्यान, नवरा बायको हे संसाराची दोन चाके आहेत. यातील एखादे जरी चाक निखळून पडले तर अख्खं जीवन जगणं कठिन होतं. त्या व्यक्तिवर पुर्णता दुःखाचा डोंगर कोसळतोय.
काही वर्षांपूर्वी मंगेश राऊत आणि राधिका यांचा विवाह झाला. त्यांचे वैवाहिक जीवन अगदी व्यवस्थित सुरु होतं. काही दिवसानंतर मंगेश आणि राधिका यांना एक पाच वर्षीय मुलगा आणि एक ३ वर्षीय मुलगी आहे. विराट आणि अणू अशी त्यांचे नावे आहेत. दरम्यान, मंगेश हा शेतकरी असून त्यांच्या अंगावर मोठं कर्ज झालं होतं.
त्यातून त्यांनी २३ मार्च २०२२ रोजी आत्महत्या केली. नवरा मंगेशच्या मृत्यू नंतर राधिका हिच्या समोर मोठी संकटं निर्माण झाली होती. पण आपली सून समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा तिने सौभाग्यवती राहावे, आणि तिच्या कपाळावर नेहमी कुंकू हसत राहावे. असा विचार करत कुटुंबीयांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यात तिला दोन मुलं आहेत.
तिला जगण्याचा आधार मिळावा, आणि मुलांचे जीवनही चांगलं सुखदायी व्हावे, यासाठी दिरानेच म्हणजे सुमित राऊत या तरूणाने विधवा वहिनी बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुटुंबियांनी मृतक मंगेशचा लहान भाऊ सुमित याचं राधिका बरोबर लग्न लावून दिले. २६ नोव्हेंबर रोजी नातेवाईकांच्या उपस्थित नोंदणीकृत आणि समाज रीतीप्रमाणे हा विवाह पार पडला. अशाप्रकारे विधवा वहिनी आणि दिर लग्न बंधनात अडकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.