Beed News Saam
महाराष्ट्र

Beed Crime: लग्नाच्याच दिवशी तरूणीचं टोकाचं पाऊल, मामाच्याच घरात गळफास घेत आयुष्य संपवलं; बीड हादरलं

Girl Ends Life on Wedding Day After Blackmail Accused Arrested: छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे, ही तरुणी आज २० एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकणार होती.

Bhagyashree Kamble

छेडछाड आणि ब्लॅकमेलिंग कंटाळून बीडच्या एका तरूणीनं आत्महत्या केली आहे. मामाच्या घरातच तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही तरुणी आज २० एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकणार होती. मात्र, लग्नाच्या दिवशीच तिने मामाच्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. तसेच तपास करून आरोपी अभिषेक कदमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र, त्याला लगेच जामिन मिळाल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर बीड पुन्हा एकदा हादरले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मागील काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमध्ये एका तरूणीने लग्नाच्या दिवशीच टोकाचे पाऊल उचलले आहे. मामाच्या घरातच तिने गळफास घेऊन स्वत:ला संपवलं आहे. तिने आयुष्य संपवण्यामागचं कारण म्हणजे, छेडछाड आणि ब्लॅकमेलिंग.

गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी अभिषेक कदम आणि त्याची १० ते १२ जणांची टोळी गावातील तरूणींना जाळ्यात ओढून फसवत आहेत.

अभिषेक कदम याने मृत मुलीला देखील छळल्याचा आरोप आहे. २० एप्रिल रोजी मृत मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या दिवशीच तिने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. पीडित तरूणीने मामाच्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. लग्नाच्या दिवशीच तरूणीचा मृत्यू झाल्यामुळे कांबळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कारवाईला सुरूवात केली. आरोपी अभिषेकला बेड्याही ठोकल्या. मात्र, आरोपीला लगेच जामीन मिळाला. या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT