Nashik News
Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

रूढी परंपरांना फाटा देत वऱ्हाडी मंडळींना अनोखी भेट

अभिजीत सोनावणे

नाशिक - विवाह सोहळ्यातील अनिष्ट प्रथांना फाटा देत राक्षसभुवनच्या आदिवासी नवदांपत्याने लग्नातील पारंपरिक रूढी परंपरांना फाटा देत वऱ्हाडी मंडळींना ११०० आम्र वृक्षांची भेट देत अनोख्या पद्धतीने विवाह करत निसर्ग संवर्धनाचा वारसा जोपासला आहे. विवाह सोहळ्यात कपडे, दागदागिने, अनावश्यक भेट वस्तू एकमेकांना देऊन स्वागत केले जात. त्यामुळे अनावश्यक खर्च देखील होतो.

हे देखील पाहा -

त्यामुळे या सर्व रूढी परंपरांच जोखड फेकून देत भुसारे कुटुंबीयांनी वृक्षांची भेट देऊन कायमस्वरूपी हा विवाह सोहळा स्मरणात रहावा तसच वऱ्हाडींना भविष्यात निसर्ग संवर्धनाच्या संदेशाबरोबरच आंब्याची गोड फळे चाखता यावी यासाठी आम्र वृक्षांचे वाटप करुन हा विवाह सोहळा पार पाडला.

दोन वर्षे राज्यावर कोरोनाचे सावट होते. या दुष्काळात शेतकरी होरपळून निघाला होता. त्यातच अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागल. मात्र तरीही ग्रामीण भागात हुंडा, कन्यादान आणि अन्य भेटवस्तू, मानापानाचे आहेर देण्याची प्रथा तसच सामाजिक प्रतिष्ठेसाठी थाटामाटात लग्न करण्याच्या मानसिकतेमुळे ऐपत नसतानाही प्रचंड खर्च केला जातो.

सध्याच्या प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत बहुतांश शेतकरी कुटुंबांना लग्नाचा वाढता खर्च झेपत नाही आहे. त्यामुळे एक तर कर्जबाजारी होऊन अथवा शेतीचा तुकडा विकून लग्न सोहळा पार पाडला जातो. त्यामुळे लग्नातील या अनिष्ट प्रथा आणि मानपान बंद व्हावेत, या हेतूने भुसारे कुटुंबियांनी लग्नकार्यात आहेर अथवा भेटवस्तू स्विकारली नाही. उलट वऱ्हाडी मंडळींना आम्र वृक्षांची भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आल.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमध्ये नवा ट्विस्ट! रमेश जाधव यांच्या उमेदवारीमागे ठाकरेंची राजकीय खेळी की आणखी काही?

Avinash Jadhav : अविनाश जाधवांची पोलिसांसमोर सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला मारहाण, व्हिडिओ आला समोर

Sangli Helicopter Emergency Landing | हेलिकॉप्टरचं ईमरजन्सी लँण्डिंग...

Health Tips: 'या' पदार्थंसोबत चुकूनही लिंबाचे सेवन करू नये

Vrat Recipe: व्रतासाठी 'या' सोप्या पद्धतीने बनवा खुसखुशीत थालीपीठ

SCROLL FOR NEXT