Ujjwal Nikam  Saam Tv
महाराष्ट्र

Ujjwal Nikam: मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Rohini Gudaghe

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदार संघातून ॲड. उज्वल निकम निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निकम यांना पराभूत केलंय. लोकसभा निवडणूकीची धामधूम संपल्यानंतर आता ॲड. उज्वल निकम पुन्हा एकदा न्याय विभागाच्या कक्षेत दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्य शासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २४ (८) नुसार उज्वल निकम (Ujjwal Nikal) यांची विशेष सरकारी वकील म्हणून फेरनियुक्ती केलीय. त्यामुळे आता राज्यभरात विविध जिल्ह्यातील उज्वल निकम २९ प्रकरणांत पुन्हा काम पाहणार (Ujjwal Nikam Once Again Public Prosecutor) आहे. सांगलीतील अनिकेत कोथळे खून खटल्याचं देखील ते काम पाहणार आहेत. याबाबत १० जून रोजी कायदा आणि न्याय विभागाने सूचना जारी केली आहे.

ॲड. उज्वल निकम लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजप उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी निकम यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी हा राजीनामा राज्य विधी आणि न्याय विभागाकडे सोपावला होता. त्यामुळे निकम यांच्याकडील असलेले प्रलंबित खटले सरकार कोणाला सोपवणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं (Public Prosecutor) होतं.

लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे उज्वल निकम यांना मोठा धक्का बसला. त्यांचा पराभव झाला. त्यामुळे निकम पुन्हा सरकारी वकील म्हणून काम करणार का? त्यांच्याकडील खटल्यांत हजर राहणार (Lok Sabha Election) काय? याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. आता याला पूर्णविराम बसला आहे. कारण ॲड. निकम विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहात आहेत. सांगलीतील न्यायालयामध्ये १३ रोजी याबाबत सूचना प्राप्त झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

Israel Iran War : इस्रायलच्या टार्गेटवर इराणी अणुभट्ट्या?, IDF ट्रुथफूल प्रॉमिस-2 करणार लाँच

SCROLL FOR NEXT