Samruddhi Mahamarg Accient News:  Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! आयशर- ट्रॅव्हल्सची धडक; १५ प्रवासी जखमी, २ गंभीर

Samruddhi Mahamarg Accient News: समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला ट्रॅव्हलर टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

छत्रपती संभाजीनगर, ता. १ ऑगस्ट २०२४

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. अशातच समृद्धी महामार्गावरुन एक मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या आयशरला ट्रॅव्हलर टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, समृद्धी महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ ही अपघाताची घटना घडली असून रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला टेम्पोट्रॅव्हलरने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये १५ प्रवासी जखमी झाले असून त्यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्सने ट्रकला दिलेली धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. जखमींपैकी ड्रायव्हर आणि सहायकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT