Supreme Court  Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News: छत्रपती संभाजीनगर, धाराशिवच्या नामांतरविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; शिंदे सरकारला दिलासा

Supreme Court On Chhatrapati Sambhajinagar Dharashiv Renaming Case: संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेले आहेत, असं कोर्टाने म्हटले आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २ ऑगस्ट २०२४

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली असून महाराष्ट्रातील नामांतर प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

राज्य सरकारने उस्मानाबादचे नामांतर 'धाराशिव' तर औरंगाबादचे नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात दाखल झालेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं या निर्णयाच्या विरोधात याचिकाकर्त्यांने सुप्रीम कोर्टात अपिल केले होते.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली!

निव्वळ राजकिय हेतूनंच हा निर्णय घेण्यात आल्याचे या याचिकेमध्ये म्हटले होते. यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. ज्यामध्ये कोर्टाने यासंबंधीची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेले आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे.

कोर्टाने काय म्हटलं?

नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेले आहेत. जेव्हा नाव देण्याचे अधिकार असतात तेव्हा नामांतर करण्याचे सुद्धा अधिकार असतात. नाव बदलले की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच. अलाहाबाद व औरंगाबाद प्रकरण सारखे नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT