Nawab MAlik Saam Tv
महाराष्ट्र

Nawab Malik News: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 'सर्वोच्च' दिलासा! जामिनावर २ आठवड्यांची मुदतवाढ

Nawab Malik Money Laundring Case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली. ता. १२ जुलै २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायलयाने मोठा दिलासा दिला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने आणखी दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. आज नवाब मलिक यांच्या जामिनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांच्याकडून जामीनावर मुदतवाढ मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता.

नवाब मलिक यांच्या या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या जामीनाला आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. २०२२ मध्ये कथित गोवावाला कंपाऊंड प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ते आरोग्याच्या कारणामुळे जामिनावर बाहेर आले होते.

दरम्यान, नवाब मलिक यांनी राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीलाही हजेरी लावली होती. आज विधानभवनात दाखल होत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचीही भेट घेतली. त्यामुळे मलिक यांनी नेमकं मतदान कुणाला केलं? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT