Samruddhi Mahamarg Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर पडला जीवघेणा खड्डा; पुलाला भगदाड पडल्याने वाहनचालक धास्तावले

Samruddhi Highway News: आधीच समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही. त्यातच आता हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर ठिकाठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतंय.

Satish Daud

Samruddhi Mahamarg Latest Marathi News

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा उद्घाटनापासूनच चर्चेत राहिला आहे. आधीच महामार्गावरील अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही. त्यातच आता हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर ठिकाठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतंय. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनचालक धास्तावले आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरत ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) उद्घाटनाला अवघ्या वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, उद्धाटनानंतर काही महिन्यातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर शुक्रवारी (१ मार्च) अचानक खड्डा पडला. महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.  (Latest Marathi News)

समृद्धी महामार्ग सुरू होऊन जेमतेम एक वर्ष उलटून गेलं आहे. या महामार्गावर आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यातच १२० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहने अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. हा टप्पा भरवीर ते इगतपुरी असा असणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील 25 किलोमीटर लांबीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा महामार्ग वापरात येणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT